Personal Driver (India)

Personal Driver (India)

12 Sep
|
Nero Group
|
India

12 Sep

Nero Group

India

कामाची वेळ:-सोमवार ते शनिवार

- सकाळी 9:00 ते संध्याकाळी 6:00
- सकाळी 9:00 वाजेपर्यंत गाडी पूर्णपणे स्वच्छ करून प्रवासासाठी तयार ठेवणे.
- कामाच्या वेळेत आवश्यकतेनुसार वयक्तिक व कार्यालयातील सोपवलेली कामे जबाबदारीने पूर्ण करणे.
- संध्याकाळी 6:00 नंतर कामासाठी थांबावे लागल्यास ओव्हरटाईमचा मोबदला मासिक वेतनासोबत अदा केला जाईल.

प्रोबेशन कालावधी

- रुजू झाल्यानंतरचा पहिला एक महिना प्रोबेशन कालावधी असेल.
- या कालावधीत कामाची गुणवत्ता, शिस्त, वेळेचे पालन, प्रामाणिकपणा व नियमांचे पालन यांचे मूल्यांकन करण्यात येईल.
- समाधानकारक कामगिरी झाल्यासच नोकरी कायम करण्यात येईल.

मुख्य जबाबदाऱ्या:-वाहनाची देखभाल

- वाहन रोज स्वच्छ, व्यवस्थित व प्रवासासाठी तयार ठेवणे.
- वाहनाच्या आतील व बाहेरील भागाची नियमित साफसफाई करणे.
- वाहन पॉलिश करणे तसेच इंजिन विभाग स्वच्छ ठेवणे.
- वाहनात नियमित फ्रेशनर वापरणे.
- रिकाम्या पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा त्वरित काढून टाकणे.
- वाहनात नेहमी:
- पिण्याचे पाणी
- टिश्यू पेपर
- आवश्यक वस्तू उपलब्ध ठेवणे.
- RC Book
- Insurance
- PUC Certificate
- Tax
- Servicing Records
- Challan / Receipt
- इतर आवश्यक कागदपत्रे





Renewal ची तारीख लक्षात ठेवून वेळेत माहिती देणे आवश्यक आहे.

वाहन चालविण्याचे नियम

- वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे.
- लेन शिस्त पाळणे बंधनकारक.
- हायवेवर वाहनाचा वेग 100 किमी/तासपेक्षा जास्त नसावा.
- सुरक्षित, संयमी व जबाबदारीने वाहन चालविणे.
- कोणत्याही प्रकारचे धोकादायक ड्रायव्हिंग, अचानक ब्रेक, वेगवान वळणे किंवा मोबाईल वापरत वाहन चालविणे पूर्णपणे निषिद्ध आहे.

प्रवासादरम्यान आचारसंहिता

- साहेबांसोबत पाहुणे असल्यास वाहनाचा दरवाजा उघडून त्यांना आदराने बसवणे व उतरवणे.
- पाहुण्यांशी नम्र व सभ्य वर्तन करणे.
- गाडीत मिटिंग सुरू असल्यास आवश्यक असल्यास गाडीबाहेर उतरून प्रतीक्षा करणे.
- वाहन पार्क केल्यानंतर वाहनाजवळच थांबणे.
- वाहन सोडून इतरत्र फिरणे, खरेदी किंवा वैयक्तिक कामासाठी जाणे मान्य राहणार नाही.
- वाहनात रिकाम्या वेळेत झोपणे निषिद्ध आहे.

गोपनीयता (Confidentiality)

- साहेबांचे वैयक्तिक किंवा व्यावसायिक संभाषण पूर्णपणे गोपनीय ठेवणे.




- साहेब कुठे जातात, कोणाला भेटतात किंवा कोणते काम करतात याची माहिती तृतीय व्यक्तीस देणे गंभीर शिस्तभंग मानला जाईल.
- वाहनातील कोणतीही कागदपत्रे किंवा वस्तू अत्यंत काळजीपूर्वक सांभाळणे.

मोबाईल वापर

- वाहन चालविताना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे.
- कार्यालयीन वेळेत वैयक्तिक मोबाईलचा वापर टाळावा.
- सोशल मीडिया, गेम्स किंवा अनावश्यक मोबाईल वापर निषिद्ध आहे.

पोशाख व व्यक्तिमत्त्व:-कामावर येताना खालील बाबी अनिवार्य आहेत.

- स्वच्छ इस्त्री केलेले कपडे
- शूज व मोजे
- नीटनेटकी दाढी व केस
- साधा व सभ्य पोशाख
- भडक किंवा रंगीबेरंगी कपडे वापरू नयेत.

सुरक्षा व शिस्त

- कार्यक्रम किंवा मिटिंगच्या ठिकाणी प्रथम प्रवाशांना सुरक्षित उतरवून नंतर वाहन पार्क करावे.
- वाहनात असलेल्या सर्व महत्त्वाच्या वस्तू व कागदपत्रांची पूर्ण जबाबदारी ड्रायव्हरची असेल.
- वाहनाची चावी व कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत.

पोलीस पडताळणी

- उमेदवाराविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसावा.
- रुजू झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत Police Verification Certificate सादर करणे बंधनकारक राहील.

Pay: ₹15,000.00 - ₹24,000.00 per month

Work Location: In person

📌 Personal Driver (India)
🏢 Nero Group
📍 India

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: personal driver (india) / india